fbpx Press "Enter" to skip to content

ना तणाव, ना बॉसची चिंता, आणि भरपूर पैसा! जाणून घ्या जगातील ह्या अमेझिंग जॉब्स बद्दल…

Spread Post

आज आम्ही तुम्हाला काही अश्या नोकऱ्यांबाबत सांगणार आहोत, ज्यांच्याबद्दल कदाचित तुम्ही कधीही ऐकले नसेल. या नोकऱ्यांमध्ये ना आहे कोणता तणाव ना  बॉसची चिंता…!

भाडेतत्वावर प्रियकर आणि प्रेयसी

मानवी स्पर्शाला सर्वात मोठी हिलिंग शक्ती मानली जाते. जर तुमच्या जवळ असे कोणी नाही आहे, जो तुम्हाला प्रेमाचा स्पर्श देऊ शकेल तर तुम्ही भाड्याने गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड घेऊ शकता आणि त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करू शकता. ८ हजार रुपये प्रत्येक तासाला देऊन ही सेवा कितीतरी कंपन्या देतात.

rent a boy friend/girlfriend

एक परफेक्ट जॉब म्हणून देखील गेल्या काही काळापासून तरुणवर्ग या नोकरीकडे पाहू लागला आहे.

शॅम्पेन फेशियल स्पेशलिस्ट

champagne facial specialist

ही अतिशय मजेशीर नोकरी आहे. लोक यामध्ये आपले करियर सुद्धा घडवतात. यात पार्टीमध्ये जाऊन मुलींना शॅम्पेन फेशियल द्यायचे असते. नॉर्थ अमेरिकेच्या क्लब मध्ये क्रिरील बिचुतकस्की नावाचा फोटोग्राफर आहे, ज्याने हे शॅम्पेन फेशियल सुरु केले होते. ह्यासाठी त्याला चांगली मोठी रक्कम दिली जाते.

प्रोफेशनल ब्राइडमेड्स

professional Bridesmaid

जर तुम्ही फोटो मध्ये चांगली पोज देण्यासाठी परिपूर्ण आहात, तर तुम्ही ही नोकरी करू शकता. यासाठी २० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत मानधन दिले जाते.

प्रोफेशनल लाइन स्टँडर

professional line stander

जर तुम्हाला रांगेमध्ये उभे राहण्यास कंटाळा येत नाही, तर ही नोकरी तुमच्यासाठीच आहे. यामध्ये फक्त तुम्हाला रांगेमध्ये उभे राहून वाट बघायची आहे.

त्यासाठी तुम्हाला आठवड्याला ६७ हजार रुपये दिले जातील. अॅपल उपकरणांच्या लाँच वेळी रांगेमध्ये उभे राहणे किंवा कोणत्यातरी चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासठी रांग लावणे अशा नोकऱ्या या मध्ये समाविष्ट आहेत.

कंडोम टेस्टर

condom tester

ऑस्ट्रेलिया मध्ये डयूरेक्स कंपनी कंडोम टेस्टरसाठी २०० पेक्षा जास्त जागांची भरती काढते. यामध्ये एका कंडोमच्या टेस्ट साठी ४०२८ रुपये दिले जातात. यामध्ये तुम्हाला कंडोमचा वापर करून दाखवायचा आहे.

आइसक्रीम टेस्टर

ice cream taster

जर तुम्ही आइसक्रीमसाठी वेडे आहात तर ही नोकरी फक्त तुमच्यासाठीच आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आइसक्रीमची चव घेऊन त्यांना नावे द्यावी लागतात .कित्येक कंपन्या अश्या नोकऱ्या ऑफर करतात.

प्रोफेशनल स्लीपर

professional sleeper

जर तुम्हाला झोपण्यासाठीही पैसे दिले गेले तर ह्यापेक्षा चांगली नोकरी कोणतीच असू शकत नाही. बरोबर ना?

जलपरी

professional mermaid

जलपरी बनायला कोणाला नाही आवडणार आणि त्यासाठी तुम्हाला पैसे देण्यात आले तर तुम्ही रोजच जलपरी बनून राहण्यास तयार व्हाल. काही देशात यासाठी ट्रेनिंग पण दिली जाते. ज्यामध्ये तुम्ही फिन बरोबर पोहायला शिकता. मरमेड पार्टी स्विमिंग मध्ये प्रोफेशनल जलपरींना हायर केले जाते.

नेल पॉलिशचे नाव ठेवणे

nail polish naming

ह्या नोकरीत तुम्हाला नेल पॉलिशला नावे द्यायची असतात. यामध्ये नवीन-नवीन नेल पॉलिशच्या रंगाच्या हिशोबाने नावे देऊन तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.

काय आहेत की नाही हे जॉब्स अमेझिंग…?!

 

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 3 =