Press "Enter" to skip to content

किसान सन्मान निधी आता प्रत्येक शेतकरी परिवारासाठी : विनोद अग्रवाल

Spread Post

गोंदिया : भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधी सगळ्याच शेतकऱ्यांना लागू केली आणि वचनाम्यातील आपले पहिले वचन पूर्ण केले. याचा फायदा देशातील करोडो शेतकरी बांधवांना होणार असून किसान सन्मान योजनेत आणखी संशोधन करण्यात आले आहे ज्यामुळे प्रत्येक ७/१२ वर शेतकरी बांधवाना ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याने ४५ हजार नवे लाभार्थी या योजनेशी जोड्ल्या जाणार असून आणखी व्याप या योजनेचा वाढवण्याच्या विचारात भाजप सरकार आहे असे प्रतिपादन गोंदिया जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे पूर्व गोंदिया जिल्हाध्यक्ष श्री. विनोद अग्रवाल यांनी केले. जर ७/१२ वर परिवाराच्या प्रत्येक सदस्याचे नाव असेल तर एकालाच नाही तर आता पूर्ण परिवारासाठी ते ६ हजार रुपये असणार आहेत ज्यात पती पत्नी आणि १८ वर्षाखालील मुले याना मिळून एक परिवार मानण्यात येईल. किसान सन्मान निधी अंतर्गत प्रति ७/१२ सरकारने ६ हजार रुपये देण्याचे ठरविले होते मात्र गावात संयुक्त परिवार अशी पद्धत असल्याने त्याचा लाभ फक्त १ च परिवाराला होत होता. मात्र आता किसान सन्मान निधी मध्ये नवे संशोधन करण्यात आले असून जर एका ७/१२ मध्ये एका पेक्षा अनेक परिवार असतील तर प्रत्येक परिवार ६००० रुपये सरकार देईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.

ग्राम दासगाव खुर्द येथील २५/१५ योजने अंतर्गत विठ्ठल रुख्मिणी मंदिर प्रांगणात सुशोभीकरण करण्यात येणार असून पेव्हर ब्लॉक लावण्याच्या कामाचा भमिपूजन सोहळा श्री. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री. रामराजजी खरे (प.स. सदस्य तसेच गटनेते), सरपंच सौ. मायाताई कोल्हे, उपसरपंच श्री. सुर्यभानजी चव्हाण, श्री. रेखलालजी बिसेन, श्री. सुकलालजी बोपचे, श्री. योगेशजी निखाडे, श्री. गौरीशंकरजी कोल्हे, कविताताई रहांगडाले, ममताताई तुमडाम, कविताताई दुधबुरे, ममताताई चौरे, इमलाबाई काटेवार, तसेच ग्रामपंचायत चे पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 9 =