Press "Enter" to skip to content

गाेंदिया शहरातील घरकुलांकरिता मिळाला ५१५ लक्ष रुपयांचा निधी

Spread Post

गोंदिया : गोंदिया शहरात नगर पालिकेच्या वतीने पंतप्रधान घरकूल योजनेचे काम जोमात सुरू आहे.
प्रत्येक गरजवंताला स्वत:चे घरकूल देण्याची योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुरू आहे.
पालिकेने या योजनेकडे जातीने लक्ष घालून जास्तीत जास्त घरकूल बांधून देण्याचा निश्चय गाेंदिया नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी केला आहे.
गोंदिया शहरात साडेसात हजार घरकूल बांधण्याचे लक्ष्य आहे.
त्याकरिता संपूर्ण यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.
पहिल्या टप्प्यात ५१५ घरकुलांना मंजूरी देण्यात आली होती.
त्या घरकुलांकरिता निधी देखील लाभार्थ्यांच्या खात्यावर वळता करण्यात आला.
आता पुन्हा ५१५ घरकुलांना मंजुरी मिळाली. लाभार्थ्यांनी घरकूल तयार करण्याचे काम देखील सुरू केले.
मात्र अद्याप निधी आला नव्हता.
नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी शूक्रवार ता. १९ ला मुंबई येथे ग्राम विकास विभागाचे अपर सचिव संजय कुमार यांची माहाराट्राच्या मंत्रालयत भेट घेवून याबाबत ची परिस्थितीची जाणीव करून दिली.
यावेळी त्यांच्यासह माजी आमदार खाेमेश्वर राहांगडाले, भाजपा चे जिल्हा सचिव अमृत इंगळे उपस्थित होते.
अपर सचिवांनी क्षणाचाही विलंब न करता ५१५ घरकुलांना प्रत्येकी १ लक्ष रुपये असा एकूण ५१५ लक्ष रुपयांचा निधी देण्याला त्वरीत मंजूरी दिली.
तातडीने हा निधी नगर पालिकेच्या खात्यावर टाकण्याचे निर्देश ही त्यांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना दिले.
घरकुलाच्या पहिल्या टप्प्याचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे असल्याची माहिती अध्यक्ष अशोक इंगळे यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + 15 =