Press "Enter" to skip to content

भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय बैठका

Spread Post

तुमसर (१४ जून) : भारतीय जनता पक्ष भंडारा जिल्ह्याचा वतीने तुमसर विधानसभा क्षेत्रातील येरली, देव्हाडी व खापा जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय आढावा बैठक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये बुथनिहाय माहिती घेण्यात आली. लोकसभा निवडणुकी संबंधाने कार्यकर्त्यांचे मूल्यमापन, पक्ष वाढीच्या दुष्टीकोनातून इच्छुक कार्यकर्त्यांशी संवाद साधला गेला. पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने खूप मोठा विजय मिळवला आहे. अशाप्रकारे विजय आपल्या पुढे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असेही यावेळी सांगण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागातील सर्व सामान्य कुटुंबातील लोकांना शासनाच्या विविध प्रकारचे योजनेचा लाभ मिळाला किंवा नाही याची माहिती सुद्धा भाजपा जिल्हाध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांचे कडून घेण्यात आली तसेच इतर महत्त्वाचा विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पटले, जिल्हा महामंत्री मुन्ना पुंडे, बंडू बनकर सह जिल्हापरिषद क्षेत्रातील लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *