Press "Enter" to skip to content

भारतीय जनता पक्ष भंडारा जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय बैठका.

Spread Post

तुमसर (१२ जून) : भारतीय जनता पक्ष भंडारा जिल्ह्याचा वतीने तुमसर- मोहाडी, साकोली- लाखनी- लाखांदूर व भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय बैठका दि. १३.०६.२०१९ पासुन ते ०५.०७.२०१९ पर्यन्त भंडारा जिल्ह्यात भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. या बैठकीला घेण्यात येणारे विषय – नुकतेच झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे बुथनिहाय आढावा, लोकसभा निवडणुकी संबंधाने कार्यकर्त्यांचे मूल्यमापन, पक्ष वाढीच्या दुष्टीकोनातून इच्छुक कार्यकर्त्यांसंबंधी चर्चा- विमर्श करणे व जिल्हाध्यक्ष यांचे परवानगीने वेळेवर येणारे विषय. तरी जिल्हापरिषद क्षेत्रातील सर्व बूथ समित्या, शक्ती केंद्र प्रमुख, पंचायत समिती क्षेत्र प्रमुख, जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख, जिल्हापरिषद शेतातील लोकप्रतिनिधी तसेच जिल्हापरिषद क्षेत्रामध्ये असणारे तालुका जिल्हा स्तरीय, भाजपचे सर्व कार्यकर्ते यांनी बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हा अध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी केले आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *