Press "Enter" to skip to content

युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थांचे सत्कार.

Spread Post

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खापा ग्रामपंचायत येथे झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून येथे आयोजित सबज्युनीयर स्पर्धेत उंच उडीत रुपाली सुरेश काळे हिने ३.८६ मीटर लांब उडी मारून तृतीय क्रमांक पटकाविला. त्याबद्दल शिवसेना तुमसर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

रुपाली ही पाचव्या वर्गाची विद्यार्थीनी असून तुमसर तालुक्यातील खापा येथील रहिवासी आहे. वडील मोलमजुरी करून कुटुंबाचे पालन पोषण करतात. अशा या कुटुंबातील रुपालीने क्रीडा क्षेत्रात आपले नाव चमकाविले आहे. तसेच सरस्वती हायस्कूल खापा येथून लोकेश कोल्हारकर हा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना शालेय वस्तू, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, तरूण बेरोजगार कृती समितीचे अमित एच. मेश्राम, शहर प्रमुख नितीन सेलोकर, विभाग प्रमुख संजय झंझाड, ईश्वर भोयर, सचिन मोहतुरे, रामेश्वर ठवकर, कैलास नागदेवे, शाखा प्रमुख महेंद्र मेश्राम, विलास कनोजे, प्रकाश आगाशे, पंकज तलवारे, कैलास तितीरमारे, शेष गणवीर, महेंद्र चाचिरे सह ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते.

#amit_h_meshram. 👤

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *