Press "Enter" to skip to content

विविध खेळाडूंचा भारतीय जनता पक्षात प्रवेश खेळाडूंना न्याय देणारा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी : विनोद अग्रवाल

Spread Post

भाजप सरकार हे खेळाडूंचे प्रश्न सोडवण्यात आघाडीवर असून खेळाला चालना खूप मोठ्या प्रमाणात २०१४ ते २०१९ च्या दरम्यान मिळाली आहे त्याचा परिणाम असा झाला कि अनेक स्पर्धेत भारताने बाजी मारली असून देशाचे नाव मोठे केले आहे. नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री चषक सारख्या स्पर्धेमुळे गोंदियातील खेळाडूंना राज्यस्तरावर चमकण्याची संधी मिळाली होती आणि त्यात त्यांनी लक्षणीय यश सुद्धा प्राप्त केले होते. याच सर्व बाबींना आकर्षित होऊन गोंदिया शहरातल्या विविध खेळाडूंनी आज भारतीय जनता पक्षाचे पूर्व जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद गोंदिया चे माजी उपाध्यक्ष श्री. विनोद अग्ग्रवाल यांच्या नेतृत्वात तसेच भारतीय जनता पार्टी गोंदिया शहर अध्यक्ष श्री. सुनील केलनका यांच्या प्रमुख उपस्तीथी मधे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कब्बडी, नृत्य, जिम अशा प्रकाच्या विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये हरीश काळसर्पे, प्रसून शुक्ला, शैलेश बांगडकर, रोहित कनोजिया, आकाश नेवारे, सागर नंदेश्वर, राकेश बोरकर, प्रमोद साठवणे, प्रित कांबळे, अश्विनी मेंढे, शिखा लांजेवार, आकांशा बनसोड, जशोदा सोनवाने आणि आशा चौधरी यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला. श्री. विनोद अग्रवाल यांनी पक्षाचे दुप्पटे देत भारतीय जनता पक्षात स्वागत केले. खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांना राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे श्री विनोद अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *