Press "Enter" to skip to content

शिक्षणाच्या बाजारीकरणाला काँग्रेसच जवाबदार : विनोद अग्रवाल

Spread Post

गोंदिया : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना किंवा मुलींना उच्च शिक्षित करण्याची इच्छा असते. शहरातल्या सर्वात चांगल्या शाळेत माझी मुलं शिकली पाहिजे असं प्रत्येक पालकांचे विचार असतात. पण काँग्रेसच्या काळात झालेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे सर्वात मोठा फटका हा सामान्य लोकांना बसला. आज शिक्षण घ्यायचे म्हटले तर लाखो रुपये सामान्य लोकांना भरावे लागतात. काँग्रेस चे सरकार असतांना सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करत आपल्या लोकांना खासगी शाळा काँग्रेस सरकार ने वाटल्या आणि सरकारी शाळांचा दर्जा खालावला. सरकारी शाळा चांगल्या करण्यासाठी काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. आणि नाईलाजाने सामान्य लोकांना खासगी शाळेकडे वळावे लागले. खासगी शाळांची फी हि सामान्य लोकांना परवडण्यासारखी नाही. याला जवाबदार जुन्या काँग्रेस सरकारचे धोरणच आहे. काही दिवसांपूर्वी गोंदिया मध्ये खासगी शाळा विरुद्ध जे आंदोलन करण्यात आले होते त्यात सगळे काँग्रेस चे लोक होते. आणि अश्या आंदोलनाला आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पण हजेरी लावत खासगी शाळा कशा अन्याय करत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण सरकारी शाळांची खराब अवस्था आणि शिक्षणाचे बाजारीकरण काँग्रेसच्या काळात झाले हे आमदार महोदय विसरले असावेत असा सणसणीत टोला पूर्व जिल्हाध्यक्ष विनोद आणि जिल्हा परिषद गोंदिया चे माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी लगावला.ग्राम बड़ेगाव येथील गोवारी समाजच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात दरम्यान ते बोलत होते. या वेळी महामंत्री भाऊराव जी उके सुद्धा उपस्थित होते.

पुढे विनोद अग्रवाल म्हणाले कि डिजिटल शाळा, टेलिमेडिसिन, गावची शाळा आमची शाळा सारखे प्रयोग यशस्वीरीत्या भाजप सरकार ने राबवले आहेत. सरकारी शाळांचा दर्जा दिवसेंदिवस सुधारत असून परत एकदा सरकार शाळांकडे लोक वळत आहेत असे श्री विनोद अग्रवाल यांनी सांगितलेले. ग्राम बडेगाव येतील समस्या सोडवण्यासाठी मी आग्रही आहे आणि येत्या काळात आपल्या सर्व समस्या शासन दरबारी मांडून त्या पूर्ण करणार असल्याचे सुद्धा श्री अग्रवाल यांनी स्पष्ट केले. गोवारी समाजाला आदिवासी दर्जा देण्याचे कार्य हे भाजप सरकारनेच केले असल्याचे श्री विनोद अग्रवाल यांनी सांगितले. दरम्यान गावकरी बांधवानी भाजप मध्ये प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये माधो ठाकरे, रवींद्र ठाकरे, मिताराम ठाकरे, अनंतराम ठाकरे, यादो ठाकरे, धर्मेंद्र ठाकरे , रोशन ठाकरे, सुरेश ठाकरे, गणराज ठाकरे, शामराव ठाकरे, उमराव ठाकरे, अर्जुन ठाकरे, बसंतराव ठाकरे, यशवंतराव ठाकरे, भिवाराम ठाकरे, भागचंद ठाकरे, नरेश ठाकरे, चामरू ठाकरे, सोहन नेवारे, मोहन ठाकरे, सूकचंद ठाकरे, फुलचंद ठाकरे, परेश ठाकरे, रुपेंद्र ठाकरे, चंद्रशेखर ठाकरे, बबलू ठाकरे, ओमप्रकाश ठाकरे, चयनलाल ठाकरे, दिनेश ठाकरे, अजित ठाकरे, आशिष ठाकरे, प्रकाश ठाकरे, विनिताबाई ठाकरे, मागनबाई ठाकरे, गिरिजाबाई ठाकरे, इंद्रकलाबाई ठाकरे, फुलवतीबाई ठाकरे, प्रमिलाबबाई ठाकरे, इमलाबाई ठाकरे, फुलांबाई ठाकरे, चामरीनबाई ठाकरे, लक्ष्मीबाई ठाकरे, खेलनबाई ठाकरे, पुरणबाई ठाकरे, सीताबाई ठाकरे, लक्ष्मीबाई ठाकरे, देवबाई ठाकरे, दरकानबाई ठाकरे, ज्योतिबाच्या ठाकरे, कुंतनबाई ठाकरे, राजकुमार कापसे, राजेश कापसे, पुष्पाबाई कापसे, गुड्डीबाई ठाकरे, कमलाबाई ठाकरे, मानकीबाई ठाकरे, कुसमीबाई व, सरस्वताबाई ठाकरे, ज्योति ठाकरे, वंदनाबाई ठाकरे, अनुसयाबाई ठाकरे, रामवतीबाई ठाकरे, चमरू कापसे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *