Press "Enter" to skip to content

पिंपरीतून बारणेंना २५ हजाराचे लीड देणार : गौतम चाबुकस्वार

Spread Post

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना पिंपरीतून २५ ते ३०हजाराचे लीड देणार असल्याचा आत्मविश्वास या मतदारसंघाचे आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार यांनी सरकारनामाशी बोलताना शुक्रवारी व्यक्त केला. बारणे हे दीड, पावणे दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावाही त्यांनी केला.

वंचित बहूजन आघाडीचा उमेदवार नसता,तर अप्पा हे पन्नास-साठ हजारांनी निवडून आले असते. मात्र, वंचितचे राजाराम पाटील रिंगणात असल्याने आमचे लीड दीड लाखावर जाणार असल्याचे चाबूकस्वार म्हणाले. पाटील हे लाखभर मते घेणार आहेत. तसेच ही सर्व मते राष्ट्रवादीची असल्याने त्यामुळे तेवढे आमचे लीड वाढणार असल्याचे ‘कॅलक्युशन’ त्यांनी सांगितले. पिंपरी,चिंचवडसह सहाही विधानसभा मतदारसंघात वंचित दहा,वीस हजार मते घेणार आहेत. जेवढी मते ते खातील, तेवढे आमचे लीड वर जाणार आहे, असे गणितही त्यांनी मांडले. राष्ट्रवादीने झोपडपट्यांत पैसा वाटला.मात्र पैसे घेऊन तेथील मतदारांनी मतदान,मात्र वंचितला केले,असा दावाही चाबूकस्वार यांनी केला आहे.

गेल्या लोकसभेला बारणे यांना पिंपरीतून ५७ हजार ५३० एवढे लीड मिळाले होते.पण यावेळी पिंपरीत सर्वात कमी म्हणजे ५०.७४ टक्के मतदान (१,८९,४०४) झाले आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच चाबूकस्वार यांनी गतवेळपेक्षा यावेळी  लीड हे जवळजवळ निम्याने कमी मिळणार असल्याचे सांगितले आहे. बारणे हे २०१४ ला एक लाख ५७ हजार ३९७ मताधिक्याने निवडून आले होते. जवळपास तेवढेच लीड यावेळीही ते कायम राखतील,असा चाबूकस्वारांचा अंदाज आहे.
पिंपरीतून भाजपचे काहीजण विधानसभेला गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असून आमचं ठरलंय असं त्यांनी सांगूनही टाकले आहे. यावर बोलताना ‘त्यांचं ठरू द्या, शिवसेना काही पिंपरी सोडणार नाही,’ असे चाबूकस्वार म्हणाले. पुण्यातील आठ व पिंपरी-चिंचवडमधील तीन अशा ११ पैकी ११ मतदारसंघ भाजप घेणे कदापी शक्य नाही. तसेच आमच्या वाट्याचा व आमदार असलेला पिंपरी, तर आम्ही कधीच सोडणार नाही असेही त्यांनी निक्षून सांगितले.

More from GondiaMore posts in Gondia »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × five =