Press "Enter" to skip to content

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचा वर्धापन दिवस रविवारी

Spread Post

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचा वर्धापन दिवस रविवारी
– रमणकुमार मेठी यांना जीवन गौरव पुरस्कार
– विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
गोंदिया : ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाङ्क गोंदियाचा चौथा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रविवार, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता हॉटेल द ग्रॅड सिमामध्ये आयोजित करण्यात आला आहे. संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार रमणकुमार मेठी यांना देण्यात येणार असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाèया मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम, आदिवासी वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष अपूर्व मेठी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुनिल मेंढे, माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, अदानी पॉवर प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख चैतन्य साहू प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. गजानन डोंगरवार यांना स्व. रणजीतभाई जसानी स्मृति जिल्हा गौरव सामाजिक सेवा पुरस्कार, माणिक गेडाम यांना स्व. रामदेवजी जायस्वाल स्मृती जिल्हा गौरव साहित्यरत्न पुरस्कार, ॠषीकुमार टेंभरे यांना स्व. फाल्गुनराव पटोले स्मृती जिल्हा गौरव कृषीरत्न पुरस्कार, अनंत वालस्कर यांना स्व. रामकिशोर कटकवार स्मृती जिल्हा गौरव कर्तव्यनिष्ठ पुरस्कार, प्रा. अनिल मंत्री यांना स्व. मोहनलाल चांडक स्मृति शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार व ज्येष्ठ पत्रकार रमणकुमार मेठी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रम संयोजक जयंत शुक्ला, उपाध्यक्ष संतोष शर्मा, सचिव रवी आर्य, कोषाध्यक्ष हिदायत शेख, सहसचिव राहूल जोशी, कार्यकारिणी सदस्य अंकूश गुंडावार, कपित केकत, हरिंद्र मेठी, मुकेश शर्मा, नरेश रहिले, बिरला गणवीर, नरेंद्र qसद्रामे, जावेद खान, आशिष वर्मा, उदय चक्रधर, दीपक जोशी, अर्चख़ेना गिरी, प्रमोद नागनाथे, भरत घासले, योगेश राऊत व प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया परिवाराने केले आहे.
०००००००००

More from GondiaMore posts in Gondia »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − 2 =