Press "Enter" to skip to content

रेल्वे प्रवाश्यांच्या विविध मागण्या/अडचणी सोडविण्यासाठी खा.मा.सुनील मेंढे यांचा पुढाकार

Spread Post

रेल्वे प्रवाश्यांच्या विविध मागण्या/अडचणी सोडविण्यासाठी खा.मा.सुनील मेंढे यांचा पुढाकार

भंडारा, तुमसर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण, वरठी येथे F.O.B. ची सोय करणे ह्या विषयांसोबत गोंदिया रेल्वे स्थानकावर Lift Escalator सतत सुरु ठेवणे Drop अँड Go ची सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी विविध विषयांच्या अंमलबजावणीसाठी खा.सुनील मेंढे यांनी DRM/SECR मा.शोभना बंडोपाध्याय यांच्यासमवेत नुकतीच आढावा बैठक घेऊन चर्चा केली. याप्रसंगी रेल्वे अधिकारी राजेश सिंग-वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता, अरविंद विश्वकर्मा-वरिष्ठ विभागीय अभियंता, आशुतोष पांडे वरिष्ट विभागीय सुरक्षा आयुक्त, हरीश कुमार साहू वरिष्ठ विभागीय सांकेतिक व दूरसंचार अभियंता, हरीश कुमार महिंद्रा वरिष्ठ सहाय्यक अभियंता, के.व्ही. रामन्ना वरिष्ठ विभागीय वाणिज्य अभियंता, ए.के. सूर्यवंशी वरिष्ठ विभागीय अभियंता, तसेच रेल्वे सल्लागार समितीचे सेवक कारेमोरे, भरत भलगट, विजय खंडेरा हे देखील उपस्थित होते. ह्या बैठकीत झालेल्या चर्चेत बिलासपुर – पुणे राजधानी एक्सप्रेस ला भंडारा रोड स्थानकावर थांबा देण्यासाठी देखील चर्चा झाली असून भंडारा रोड स्थानकावर दिव्यांगासाठी सोय, वरठी बसस्थानक या सर्व विषयांवर देखील सविस्तर चर्चा झाली असल्याचे खासदार मेंढे म्हणाले.
या सर्व बाबींची पूर्तता लवकरात लवकर करणे संदर्भात शोभना बंडोपाध्याय यांनी संबधित अधिका-र्यांना सूचना दिल्या व त्याचा वेळेवर आढावा घेण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. दरम्यान खा.मेंढे यांनी घेतलेल्या पुढाकारा बद्दल रेल्वे प्रवासी संघ व प्रवासी यांनी आभार व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 7 =