fbpx Press "Enter" to skip to content

पूरपिडीतांच्या मदतीसाठी काढली निधी संकलन रॅली

Spread Post

पूरपिडीतांच्या मदतीसाठी काढली निधी संकलन रॅली

आमगावातील नागरिकांनी केली मदत: यशोदा व उडाण संस्थेचा पुढाकार

गोंदिया टुडे न्यूज़ नेटवर्क।
आमगाव : यंदा पावसाने राज्यात थैमान घातले. पावसामुळे नाशिक, कोल्हापूर व गडचिरोली जिल्ह्यातील जीवनमान अस्ताव्यस्त झाले. अनेक कुटंब उघड्यावर आले. या आपादग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पदमपूर येथील यशोदा
बहुउद्देशिय विकास संस्था व उडान बहुउद्देशिय विकास संस्थेतर्फे आमगाव येथे (दि.१२) रोजी मदत संकलन रॅली काढण्यात आली.

आमगावच्या आंबेडकर चौकातून रॅली काढण्यात आली. मदत करा, मदत करा,आपादग्रस्तांना मदत करा असे नारे देत आंबेडकर चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. गर्ल्स हायस्कूल साखरीटोला येथील मुख्याध्यापक जी.टी. फुंडे
यांनी पहिली मदत देऊन रॅलीची सुवात केली. ही रॅली आमगावच्या मुख्य मार्गाने पेट्रोलपंप चौक, संत जगनाडे चौक, मानकर चौक, गांधी चौक, सितला माता मंदिर चौक होत पाणी टाकी चौकातून परत मुख्य मार्गाने आंबेडकर चौकात
परतली. आमगावातील व्यापाºयांनी व नागरिकांनी सढळ हाताने मदत केली.

रॅलीत यशोदा बहुउद्ेशिय विकास संस्थेचे रविकांत पाऊलझगडे, नरेश रहिले, विजय कोरे, प्रेमानंद पाथोडे, जितेंद्र फुंडे, शैलेश लक्षणे, सचिन तलमले,मोहीत फुंडे, प्रदीप कावरे, दीपक भांडारकर, सचिन ढोक, मुकेश डोंगरे,
निखील बहेकार, अजय शेंडे, प्रज्वल शेंडे, अनिकेत चुटे,अरविंद बागडे,रोहीत मुनेश्वर, किरण कदम, अतूल फुंडे, बागडे, मुख्याध्यापक शरद उपलपवार, मनोज तिवारी, सेवानिवृत्त शिक्षक परसराम पटले, अवि पाऊलझगडे, अश्वीन
बोहरे, आकाश बडगे, नरेश येटरे, आशिष तलमले, रोशन बोहरे यांनी रॅली सहभाग घेऊन मदत निधी उभाण्यात हातभार लावला.

या रॅलीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीत दिला जाणार आहे. धनादेश किंवा डीडीच्या माध्यमातून हा निधी दिला जाणार आहे. अवघ्या महाराष्टÑाला
हादरवून सोडणाºया पूराने कोल्हापूर येथील जनजीवन विस्कळीत केले. तेथील बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी पदमपूर येथील तरुणांनी यशोदा व उडाण संस्थेच्या नेतृत्वात पुढाकार घेतला.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × two =