fbpx Press "Enter" to skip to content

नगराध्यक्ष च्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना कापडी पिशवी वाटप…

Spread Post

नगराध्यक्ष च्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना
कापडी पिशवी वाटप…

गोंदिया टुडे न्यूज़ नेटवर्क।
गोरेगाव: येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य कापडी पिशवी वाटपाचा कार्यक्रम गोरेगाव नगराध्यक्ष आशिष बारेवार यांच्या हस्ते दिनांक १९ सितंबर ला जिल्हा परिषद शहीद जाम-या तीम्या कनिष्ठ महाविद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पार पाडण्यात आले.

ह्या कार्यक्रमाचे आयोजन तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र गोरेगाव द्वारे आयोजित करण्यात आले.या प्रसंगी बोलताना इंजी आशीष बारेवार यानी सांगीतले की, प्लास्टिक चा जास्त वापर करुन आपन आपलेच भविष्य धोक्यात घालत आहोत ही बाब या लहान विद्यार्थयांना पटने अतिशय महत्तवाचे आहे, आनी या दृष्टिने बचत गटा द्वारे तयार केलेलि ही कापडी पिशवी एक उल्लेखनीय पाउल आहे ।

त्या कार्यक्रम मध्ये प्रमुख उपस्थित मुख्याध्यापक एम .पी. शेख. मुख्याध्यापक यादव सर. मुख्याध्यापिका हरिणखेडे मॅडम. केंद्रप्रमुख चौधरी सर, बिरणवार सर, साठवणी मॅडम. राऊत मॅडम. व संजय घासले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन योगिता राऊत तसेच पदमा सरोजकर यांनी सहकार्य केले.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 3 =