fbpx Press "Enter" to skip to content

आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवड़े

Spread Post

आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवड़े

-एकुण 10 लक्ष 96 हजार 441 मतदार

गोंदिया: दि 21 आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता आज दिनांक 21 सप्टेंबर 2019 रोजी भारतीय निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहिर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. त्या म्हणाल्या की, 21 ऑक्टोबर 2019 रोजी गोंदिया जिल्हयातील 4 विधानसभा क्षेत्रात  मतदान होणार असून 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतगणना असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले असल्याचे त्यांनी  सांगितले.
          यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी उपस्थितांना भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सूचनांची माहिती देऊन आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा वापर राजकीय कारणासाठी केला जाणार नसल्याचे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर व झेंडे काढून घेण्याची सूचना सर्व नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देण्यात आली आहे. त्याबाबत कार्यवाही सुद्धा करण्यात येत आहे. जिल्हयातील संवेदन व अतिसंवेदनशील मतदान केन्द्रांवर सुरक्षेच्या द्रष्टीने पोलिस विभागाची नजर आहे. तसेच मद्य विक्री तथा अवैद्य मद्य विक्रवर संबंधित विभागाचे लक्ष्य असून आदर्श आचारसंहितेचा भंग होईल असे कृती कोण्त्याही शासकीय विभाग, अधिकारी, कर्मचारी यांच्या कडूण होता कामा नये असे निर्देश नोडल अधिकारी यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
        उमेदवारांना निवडणुक कालावधी दरम्यान प्रत्येकी 28 लक्ष रुपये खर्च करता येईल तसेच त्यापैकी नकद 10 हजारच्यावर खर्च करता येणार नाही म्हणुन निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यसाठी निवडणूक खर्च सनियंत्रण समिती तसेच प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व सिनियंत्रण समितीसह इतर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज असून आगामी निवडणूका  शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यात येईल. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेयर व त्यांच्या मांगणीनूसार इतर सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच नागरीकांच्या विविध प्रश्न व शंका असल्यास 1950@ या टोल फ्री क्रमांकावर तथा अधिक माहितीसाठी www.nvsp.in  तसेच  www.ceo.maharashtra.govt.in या सांकेतीक स्थळावर भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांनी केले आहे.
         सदर बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी महेन्द्र पवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपअधिक्षक पोलिस (गृह) सोनाली कदम, नायाब तहसिलदार आर.एस पटले, हरिशचंद्र मडावी आदि उपस्थित होते.
चौखटीत………………….
नागरीकांच्या तक्रारी साठी मोबाईल सी-व्हीजील ऍप
या निवडणूकीत नागरीकांना निवडणूकी संदर्भात तक्रारीसाठी  सीव्हीजील (cVIGIL) या नावाने एंड्राईड मोबाईल ऍप लाँच करण्यात आली आहे.  सदर एप्लीकेशन मध्ये नोंदणी करुन तक्रारदार हे लाईव्ह व्हिडीयो तथा फोटो अपलोड करुन तक्रार करु शकतात. प्राप्त तक्रारी नंतर 100 मि. मध्ये कायर्वाही करण्यात येईल. तसेच तक्रारीसंदर्भात केलेल्या कार्यवाहीची सूचना वेळो-वेळी तक्रारदारास देण्यात येईल. नागरीकांच्या नावे गुप्त  ठेवण्यासाठी सदर ऍपमध्ये सुविधा देण्यात आली आहे.
जिल्हयात 1281 मतदान केन्द्र व सेनादलातील 1792 मतदार
जिल्हयातील चार विधानसभा मतदार संघात एकुण 1281 मतदान केन्द्र असून गोंदिया विधानसभा मतदार संघातील खमारी येथे ‍जि.प. केन्द्र प्राथमिक कन्या शाळा, खमारी येथे खोली क्र. 2 मध्ये एक सहाय्यकारी मतदान केन्द्र तयार करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे जिल्हयात चारही विधानसभा क्षेत्रात सेनादलातील एकुण 1792 मतदार आहेत.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + 15 =