fbpx Press "Enter" to skip to content

नवयुवकानी श्रमदानातून केले मोक्षधामचे कायापालट*

Spread Post

गोंदिया टुडे न्यूज नेटवर्क

*वरिष्ठ नागरिकांचा सहभाग, केले वृक्षारोपण*
*आमगाव:-* आजच्या भागदौडीच्या काळात कुणाकडे कुणासाठी वेळ नसतो, परंतु काही असेही समाजकार्य करणारे युवक असतात की अत्याधिक व्यस्त जीवनात सुद्धा समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. आमगाव तालुक्यातील काही अशाच युवकांनी मोक्षधाम सेवा समिती स्थापन करून तालुक्यातील गोंदिया रोडवरील मोक्षधाम चा कायापालट केलेला आहे .
काही वर्षांपूर्वी शहराच्या बाहेर असलेले मोक्षधाम स्मशान घाट हे जीर्ण अवस्थेत होत, अंतीम यात्रेला आलेल्या लोकांना बसायला जागा नव्हती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, जायला रस्ता बरोबर नाही अशा परिस्थितीत तालुक्यातील काही नवयुवकांनी मोक्षधाम चे कायापालट करण्याचे संकल्प केला. सकाळी काही तास वेळ काढून साफसफाई ला सुरुवात केली. स्वतः श्रमदान करून रस्त्यांची दुरुस्ती, केरकचरा काढणे करू लागले. हळूहळू नवयुवक जुळू लागली आणि मोक्षधाम सेवा समिती तयार झाली. या युवकांनी कुठल्याही प्रकारची देणगी न घेता स्वतः श्रमदान करून व स्वतःचे पैसे गोळा करून मोक्षधाम चे जीर्णोद्धार करू लागले. आज या मोक्षधाम ला वाटीका चे स्वरूप आलेले आहे. नवयुवकांना सोबत म्हणून वरिष्ठ नागरिक सुद्धा सहभागी होऊ लागले आता आठवडयातुन एकदा प्रत्येक रविवारी श्रमदान केलं जातं आहे. वरिष्ठ नागरीकांनी वृक्षारोपण करून सहकार्य करीत आहेत. अंतिम यात्रेला आलेल्या लोकांसाठी बसायला टेबल लावण्यात आले आहे. प्रेत जाळायला चबुतरा बणविण्यात आले आहेत. निशुल्क पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिव मंदीर उभारण्यात येत आहे. बाजुला वाहत असलेल्या नाल्याचे सौदर्ययिकरण करण्यात येत आहे. मोक्षधाम चा विकास व्हावा या करिता नगरपरिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे समितीने सांगितले आहे. मोक्षधाम चे कायापालट व्हावे या करिता समितीचे अध्यक्ष रवि क्षीरसागर, उपाध्यक्ष संजय बहेकार, सचिव महेश उके, राजेश मेश्राम, भोला गुप्ता, विजय मेश्राम, राजेश सातनूरकर, राजीव वंजारी, भोरचंद शेंडे, प्रमोद कटकवार, मनोज शाहू, संजय ढगे, विकास शर्मा, राजू आंबेदारे, संतोष कटकवार, सुरेश कोसरकर, सुरेश बावनथडे व सर्व सदस्य श्रमदान करून सेवाकार्य करीत आहेत.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + 11 =