Press "Enter" to skip to content

गोरेगांव:अतिवृष्टीमुळे घर कोसळले, धानच्या पिक बर्बाद…

Spread Post

गोरेगांव:अतिवृष्टीमुळे घर कोसळले, धानच्या पिक बर्बाद…

गोंदिया टुडे न्यूज़ नेटवर्क।
गोरेगाव : तालुक्यात २८ सप्टेंबरच्या सकाळपासून तर मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाने तालुक्याला झोडपून काढले. अतिवृष्टी पडल्याने अनेक घरांची पडझड झाली. तर धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यातील पिंडकेपार येथील रमेशराव चौधरी यांचे घर कोसळल्याने या आदिवासी कुटुबाला सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान पोहोचले आहे. त्याचप्रमाणे धानाचे उभे पिक खाली पडल्याने शेतकºयांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे. तात्काळ पिडीत कुटुंब व नुकसानग्रस्त शेतकºयांचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शनिवारच्या सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी, गोरेगाव मंडळामध्ये अतिवृष्टी दर्ज करण्यात आली. या अतिवृष्टीमुळे अनेक घर व गोठ्यांची पडझड झाली. त्याचप्रमाणे धानाचे उभे पिकसुद्धा जमिनीवर पसरले.

या अतिवृष्टीमुळे शेतक-यांना फार नुकसान झाले आहे. पिंडकेपार येथील रमेश चौधरी यांचे घर मध्यरात्री कोसळल्याने मोटारसायकल, सायकल, भांडे व अतिआवश्यश्क वस्तूंचे नुकसान झाले. या घटनेत सुमारे पिडीत कुटुंबाला सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली आहे. मागणी करण्यात आली आहे की, तात्काळ घटनेचा पंचनामा करून पिडीत कुटुंब व नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक देण्यात यावी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + nine =