fbpx Press "Enter" to skip to content

चार मतदार संघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षक श्री.रेड्डी व श्री.मुकुंदन जिल्हात दाखल..

Spread Post

चार मतदार संघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षक श्री.रेड्डी व श्री.मुकुंदन जिल्हात दाखल..

गोंदिया टुडे न्यूज नेटवर्क।
गोंदिया। विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2019 करीता भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चार मतदार संघाकरीता नियुक्त केलेले निवडणुक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहे.तिरोडा आणि अर्जुणी/मोरगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. श्यामसुंदर रेड्डी आणि गोंदिया आणि आमगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. आर मुकुंदन याची नियुक्ती केली आहे.

जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलिस अधिक्षक श्री. मंगेश शिंदे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी सुभाष चौधरी, निवडणुक खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी श्री. विकास राउळकर यांचेशी निवडणुक खर्च संनियत्रणासाठी करण्यात आलेल्या तयारी बाबत चर्चा केली.

श्री.मुकुंदन यावेळी म्हणाले, व्हिडीओ पथकाच्या माध्यमातुन योग्य प्रकारे निवडणुक विषयक बाबींचे चित्रीकरण करावे. कुठे आचार संहिता भंग होणार नाही यावर करडी नजर ठेवावी. राजकीय पक्ष तसेच उमेदवार ज्या वस्तु तसेच साहित्य वापरणार आहेत त्यांचे दर निश्चित करण्यात आले आहे. खर्चाचा हिशेब तपासण्याचे काम वेळीच करावे.

निवडणुक खर्च विषयक अहवाल संबधितांनी वेळेत सादर करावा असे सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील निवडणुक दृष्टिने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.

जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदार संघातील नागरिकांना निवडणुक खर्च विषयक काही तक्रारी सादर करावयाच्या असतील तर त्यांनी नियंत्रण कक्षाच्या टोल फ्रि क्रमांक 1950 यावर संपर्क साधावा. तिरोडा आणि अर्जुनी / मोरगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. श्यामसुंदर रेड्डी यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 7820872548 आणि गोंदिया आणि आमगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. आर मुकुंदन यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 8825957996 यावर संपर्क साधावा.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 − 4 =