fbpx Press "Enter" to skip to content

नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा- सचिन घनमारे

Spread Post

भंडारा – दिनांक ३१/०७/२०१९ ला भंडारा शहर काँग्रेस कमिटी तर्फे शिवनगरी येथील मुख्य रस्ता तत्काळ बनवून देण्याचे खोटे आश्वासन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी अनेक वेळा दिले. शिव नगरी येथील मुख्य रस्ता हा खड्डे मय होऊन पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरलेला आहे. त्या खड्यात शाळकरी मुल पण पडले आहेत.तेथे अनेक अपघात सुध्दा झाले आहे. या काॅलनी ला जवळ जवळ ३० वर्ष झालेली आहे. येथील नागरिक प्रामाणिक पणे नगर परिषद ला घरटॅक्स सुद्धा भरून राहिलेले आहेत.
मागच्या वर्षी ९ आॅगस्ट २०१८ ला नगर परिषदेची समाधी आंदोलन सुद्धा केले. त्याआधी अनेक आंदोलन व निवेदन सुद्धा देण्यात आले. पण आश्वासना शिवाय काहीही नव्हते. नगर परिषदेचे अधिकारी व नगरसेवक पाठ फिरविण्याचे काम करित आहे. तसेच निल्लजाप्रमाणे या गोष्टी कडे दुर्लक्ष करित आहेत.
*त्यामुळे आज दिनांक ३१/०७/२०१९ ला दुपारी २.०० वाजता पोलिस ठाणेदार मा.सुधाकरजी चौव्हान यांच्या कडे नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करन्यासाठी आज भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन घनमारे तसेच तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत व शिवनगरी येथील नागरिक पोलिस स्टेशन भंडारा येथे आले होते त्यावेळी पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी नगर परिषद मुख्याधिकारी याना दूरध्वनी वरून उद्याचा उद्या शिवनगरी येथील मुख्य रस्त्याची मी पर्यायी व्यवस्था करून देतो असे आश्वासन पोलीस निरीक्षकांना दिले.तसेच सचिन घनमारे यांनी दोन दिवसात न झाल्यास नगर परिषद येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच काही मोठी घटना घडल्यास याला सर्वस्वी जवाबदार नगर परिषदचे मुख्याधिकारी राहतील असे सचिन घनमारे यांनी पोलीस निरीक्षकांना सांगितले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत,माजी नगरसेवक पृथ्वीराज तांडेकर,जीवन भंजनकर,माजी नगरसेवक किरण कुंभरे, प्रवीण भोंदे,लक्ष्मण वानखेडे,सुहास गजभिये,पराग खोब्रागडे, भाऊराम बारेवार,राकेश आंग्रे,वाल्मिक नान्हे, योगेश बांते,राहुल घनमारे, निखिल कुंभलकर,उपस्थित होते.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 1 =