fbpx Press "Enter" to skip to content

आदिवासी आश्रम शाळेत स्मार्ट क्लासरूम तयार करणार: डॉ. परिणय फुके

Spread Post

आदिवासी आश्रम शाळेत स्मार्ट क्लासरूम तयार करणार: डॉ. परिणय फुके

मुंबई: आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा, शिक्षण सुलभ व्हावे, अभ्यासाची अधिक गोडी लागावी यासाठी आधुनिक सुविधांसह सुसज्ज स्मार्ट क्लासरूम तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिले. स्मार्ट क्लासरूमचा शुभारंभ १२ आदिवासी एकलव्य शाळांपासून होणार असल्याची माहिती यावेळी डॉ. फुके यांनी दिली.

आदिवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधांसह सुसज्ज स्मार्ट क्लासरूम तयार करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. यावेळी डॉ. फुके म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेल्या स्मार्ट क्लासरूमच्या सहाय्याने विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतील, विद्यार्थ्यांना आधुनिक दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण दिल्यास त्यांची अभ्यासात रुची वाढेल, या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळून यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी १२ एकलव्य शाळेत स्मार्ट क्लासरूम तयार करणार. विद्यार्थ्यांनी शिक्षण प्रणाली सोबत जुळवून घेतल्यास टप्प्या टप्प्याने इतर आदिवासी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम तयार करणार असल्याची माहिती श्री. फुके यांनी दिली.

यावेळी आरसियस इन्फोटेकच्या प्रतिनिधींनी स्मार्ट क्लासरूममध्ये व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजेच डिजिटल अभ्यासक्रम असलेला वर्ग, एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी यांसारख्या अभ्यासक्रमासाठी डिजिटल सामग्रीसह संगणकाची लॅब, आदिवासी शाळा आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स) असलेला सी.सी.टी.व्ही सरविलीयन्स अशा आधुनिक सोय सुविधा वापरणार.

या सर्व सेवा सौर ऊर्जेवर असल्याने यासाठी इंटरनेट सेवा कमी वापरण्यात येणार असल्याची माहिती सादरीकरणातून दिली. या बैठकीस आदिवासी विकास महामंडळाचे आयुक्त किरण कुलकर्णी, आदिवासी विभागाचे उपसचिव सु. ना. शिंदे, नाशिक येथील शिक्षण आयुक्त लोमेझ सलामे व संबंधित अधिकारी उपस्थित होते

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × one =