fbpx Press "Enter" to skip to content

केंद्र सरकारवर आरोपकरण्याऐवजी पवारांनी सर्वोच्च न्यायालयात जावे-किरीट सोमय्या 

Spread Post

केंद्र सरकारवर आरोपकरण्याऐवजी पवारांनी सर्वोच्च न्यायालयात जावे-किरीट सोमय्या 

मुंबई। साखर कारखान्यांच्या विक्रीत झालेल्यागैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालकांविरुद्ध वअन्य संबंधित मंडळींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मा.उच्च न्यायालयाने दिलेआहेत. त्यामुळे आपल्या निर्दोषत्वाची खात्री असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस चेअध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे, असेआव्हान भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष  किरीट सोमय्यायांनी आज पत्रकार परिषदेत दिले. या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश माध्यम विभागप्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते विश्वास पाठक उपस्थितहोते.

 मा. सोमय्या म्हणाले की, राज्य सहकारीबँकेकडून सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत घोटाळे झाल्यासंदर्भात मुंबई  उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या घोटाळ्याच्या चौकशीसाठीपृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असतानाच समिती नियुक्त करण्यात आली होती. यासमितीने राज्य सहकारी बँकेच्या ज्या संचालकांना दोषी ठरविले आहे, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा, असा आदेशमा. उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या नुसारच अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखलदाखल केला आहे.

यात केंद्र अथवा राज्य सरकारचा संबंध येतच नाही. या मुद्द्यातराजकारण न आणता शरद पवार यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयातआव्हान द्यावे.
 
 पवार यांनी या प्रकरणात सरकारसूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रमलक्षात घेतल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने केलेली कारवाई ही न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरु आहे, हे स्पष्ट होईल. पवार यांना याप्रकरणात आपला संबंध नाही असे वाटत असेल आणि आपण दोषी नाही याची त्यांना खात्रीअसेल तर त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध दोषारोप करण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात दादमागावी, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.

Connect us on Social Media

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 3 =